How to File Complaint Against GST Overcharging
esakal
Learn how to file a complaint if shopkeepers don’t reduce prices after GST rate cut : केंद्र सरकारने जीएसटीचे नवे दर जाहीर केले आहेत. त्यानुसार आता केवळ ५ टक्के, १८ टक्के आणि ४० टक्के जीएसटी लागणार आहे. हे नवे दर आजपासून लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे काही वस्तूंचे दर कमी होणार असून सणासुदीच्या काळात नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, काही दुकानदार जीएसटी दरकपातीचा फायदा होऊ देत नसल्याची तक्रार नागरिकांनी आहे. जर दुकानदारांनी जीएसटी दरकपातीचा फायदा ग्राहकांना दिला नाही, तर तक्रार कुठं करायची? असा प्रश्न अनेकांना पडला आहे.