
भारत सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल करत आता फक्त दोनच जीएसटी स्लॅब ठेवले आहेत. ऑटोमोबाइल इंडस्ट्रीला मोठा दिलासा देण्यात आलाय. अनेक वाहनांवरील जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के तर इलेक्ट्रिक वाहनांवर फक्त ५ टक्के जीएसटी लागू केला आहे. दरम्यान, लक्झरी कार, मोठ्या इंजिन क्षमतेच्या गाड्या आणि ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिनच्या दुचाकींवर कर वाढवून तो ४० टक्के करण्यात आलाय.