GST 2.0 : नवरात्रीच्या पहिल्या दिवशी लाखो कार्स विकल्या, ३५ वर्षांचा विक्रम मोडीत; नव्या जीएसटी स्लॅबचा ग्राहकांना फायदा

GST 2.0 : मारुतीने पहिल्याच दिवशी जवळपास ३०,००० कार डिलिव्हर केल्या आणि ८०,००० इन्क्वायरीच आल्या आहे. कारच्या मागणीत विक्रमी वाढ झाली आहे. मागील ३५ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.
Car dealerships across India witnessed record deliveries on Navratri’s first day after GST 2.0 reduced car prices.

Car dealerships across India witnessed record deliveries on Navratri’s first day after GST 2.0 reduced car prices.

esakal

Updated on

Summary

जीएसटी २.० लागू झाल्यानंतर कार स्वस्त झाल्यामुळे नवरात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी विक्रमी विक्री झाली.

मारुती, ह्युंदाई आणि टाटा मोटर्स यांनी मिळून अब्जावधींची विक्री करत ३५ वर्षांचा विक्रम मोडला.

नवीन दर रचनेमुळे लहान कारवर १८% जीएसटी आणि लक्झरी कारवर ४०% स्लॅब लागू, उपकर रद्द केला गेला.

जीएसटीचे नवीन दर लागू झाल्यानंतर बहुतेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत याचा देशातील नागरिकांना चांगलाच फायदा झाला आहे. दरम्यान नवीन दर लागू झाल्यानंतर पहिल्याच दिवशी मारुती सुझुकी इंडिया, ह्युंदाई मोटर इंडिया आणि टाटा मोटर्स सारख्या कार उत्पादक कंपन्यांनी २२ सप्टेंबर रोजी ऐतिहासिक विक्री नोंदवली. मारुतीने २२ सप्टेंबर रोजी जवळपास ३०,००० कार डिलिव्हर केल्या आणि ८०,००० इन्क्वायरीच आल्या आहे. कारच्या मागणीत विक्रमी वाढ झाली असून मागील ३५ वर्षांचा विक्रम मोडीत निघाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com