
एचडीएफसी बँकेने आपल्या सर्व्हिस पॉलिसीत मोठे बदल केले आहेत.
कॅश ट्रान्झॅक्शन, NEFT/IMPS शुल्क आणि चेकबुक सुविधा महागल्या आहेत.
नवे नियम थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करणार आहेत.
HDFC Bank: देशातील सर्वात मोठ्या खाजगी बँकांपैकी एक असलेल्या एचडीएफसी बँकने आपल्या सर्व्हिस चार्जिंग पॉलिसीत मोठे बदल केले आहेत. बँकेचा दावा आहे की हे पाऊल ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्यासाठी उचलले आहे, मात्र प्रत्यक्षात याचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.