HDFCचे माजी अध्यक्ष दीपक पारेख यांचा पहिला पगार वाचून व्हाल थक्क! 1978 मध्ये मिळालेलं ऑफर लेटर होतेय व्हायरल

राजीनामा दिल्यापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत, याचे कारण म्हणजे त्यांचा पहिला पगार.
Deepak Parekh Offer Letter
Deepak Parekh Offer LetterSakal

Deepak Parekh Offer Letter: 1 जुलै रोजी HDFC लिमिटेडच्या विलीनीकरणानंतर, HDFC बँक मूल्यांकनानुसार जगातील चौथी सर्वात मोठी बँक बनली आहे. या विलीनीकरणाच्या एक दिवस आधी, एचडीएफसीचे चेअरमन दीपक पारेख, जे जवळपास 4 दशकांपासून समूहाचे नेतृत्व करत होते, त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

राजीनामा दिल्यापासून ते सोशल मीडियावर चर्चेत आहेत, याचे कारण म्हणजे त्यांचा पहिला पगार. त्यांना 1978 साली मिळालेले ऑफर लेटर मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांचा पहिला पगार दाखवण्यात आला आहे.

19 जुलै 1978 रोजी ऑफर लेटर देण्यात आले होते

सोशल मीडियावर ट्रेंड होत असलेल्या या ऑफर लेटरबाबत, असा दावा केला जात आहे की, हे त्यांना एचडीएफसी बँकेत जॉईन करताना देण्यात आले होते. हे लेटर एका यूजरने ट्विटरवर शेअर केले आहे.

त्यानुसार दीपक पारेख यांनी बँकेत डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून पहिली जॉईनिंग झाली आणि त्यांना 19 जुलै 1978 रोजी ऑफर लेटर देण्यात आले.

हे ऑफर लेटर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लोक त्यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. सुमारे 45 वर्षे जुन्या या ऑफर लेटरमध्ये त्यांचा पगार, डीएशी संबंधित सर्व माहिती देण्यात आली आहे.

दीपक पारेख यांचे मूळ वेतन 3,500 रुपये होते.

एचडीएफसी बँकेत जॉइन करताना दीपक पारेख यांचा मूळ पगार किती होता? ऑफर लेटरनुसार, त्यांना रु.3,500 च्या मूळ वेतनावर कंपनीत रुजू होण्याची ऑफर देण्यात आली होती.

याशिवाय 500 रुपये महागाई भत्ता देण्यात आला होता. त्यात 15 टक्के एचआरए आणि 10 टक्के सीसीए यांचा समावेश होता. याशिवाय त्यांना पीएफ, ग्रॅच्युइटी, वैद्यकीय लाभ, रजा आणि प्रवास सुविधेसह ऑफर देण्यात आली होती.

Deepak Parekh Offer Letter
GST: 49 दिवसांत 4,972 बनावट GST नोंदणी रद्द, 15,000 कोटींहून अधिक करचोरी पकडली

वयाच्या 78 व्या वर्षी राजीनामा दिला

78 वर्षीय पारेख यांनी जवळपास चार दशके काम केल्यानंतर 30 जून 2023 रोजी HDFC समूहाचा निरोप घेतला. एचडीएफसी ग्रुपमधील त्यांच्या कारकिर्दीत ते डेप्युटी जनरल मॅनेजर ते ग्रुप चेअरमन झाले होते. त्यां

नी भागधारकांना पत्र लिहून आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यात त्यांनी लिहिले की, ''आता माझ्यावर निवृत्तीची वेळ आली आहे.

भविष्यातील आशा आणि अपेक्षांसह माझा निरोप घेण्याची वेळ आली आहे. एचडीएफसीमध्ये मिळालेला अनुभव अमूल्य आहे. आमचा वारसा पुसला जाऊ शकत नाही आणि आमचा वारसा पुढे नेला जाईल.''

Deepak Parekh Offer Letter
manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या अशांतपर्वाचा घटनाक्रम जाणून घेऊया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com