
Mukesh Ambani and Nita Ambani: मुकेश अंबानी हे देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत आणि त्यांची गणना जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. अंबानींचे मुंबईतील घर देखील जगातील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे. तुम्ही कधी मुंबईत गेला असाल तर ही 27 मजली इमारत दुरूनच दिसते. फक्त सहा मजल्यांवर 168 गाड्यांची पार्किंग आहे. याशिवाय जगातील निवडक लक्झरी सुविधा यामध्ये आहेत. अँटिलियामध्ये जिम, स्पा, थिएटर, टेरेस गार्डन, स्विमिंग पूल ते मंदिर आणि आरोग्य सेवा सर्वकाही आहे.