
Gold Jewellery Buying Tips
Sakal
Gold Jewellery Buying Tips: दसरा आणि दिवाळीच्या काळात सोन्या-चांदीच्या दागिन्यांची खरेदी जोरात सुरू असते. बाजारात ऑफर्सचा पाऊस पडत असतो जसे की “0 % मेकिंग चार्ज”, “हॉलमार्क फ्री गोल्ड” अशा जाहिरातींची रेलचेल असते. पण या आकर्षक ऑफर्सच्या आड एक मोठं आर्थिक गणित दडलेलं असतं, ज्यामुळे ग्राहकांच नुकसान होतं.
इन्व्हेस्टमेंट बँकर सीए सार्थक अनुजा यांनी लिंक्डइनवर एका पोस्टमध्ये हे धक्कादायक सत्य मांडलं आहे. त्यांनी सांगितलं की ज्वेलर्स “0 % मेकिंग चार्ज”च्या नावाखाली ग्राहकांकडून अनेक लपलेले चार्ज वसूल करतात. या ‘छुप्या कमाई’च्या पाच पद्धती त्यांनी सांगितल्या आहेत.