

₹10 Lakh Loan, ₹10 Lakh Interest! How to Repay Your Home Loan Faster Without Increasing EMI
eSakal
Home Loan repayment tips: आपण स्वतः च घर घेण्यासाठी किंवा बांधण्यासाठी होम लोन म्हणजेच गृह कर्ज घेतो. होम लोन घेताना त्याचा EMI बघून वाटते की कर्ज आरामात फेडता येईल एवढा काही ताण येणार नाही. मात्र लोनचा खरं खर्च लोनची रक्कम नाही तर व्याजात लपलेला असतो. समजा तुम्ही 8% व्याजदर 20 वर्षांसाठी 1 कोटी रुपयांचे कर्ज घेतले. गणित बघितले तर 20 वर्षात तुम्हाला एकूण 2.01 कोटी रुपये भरावे लागतात. म्हणजेच 1 कोटीच्या मुळ रकमेवर फक्त व्याजच 1.01 कोटी रुपयांचे भराव लागत. त्यामुळे होम लोन बघताना फक्त EMI नाही तर एकूण रीपेमेंट आणि व्याज किती आहे हे बघण गरजेचं आहे.