
आयुष्मान भारत योजनेतून 5 लाखांपर्यंत मोफत उपचाराची सुविधा दिली जाते.
देशातील 31 हजारांहून अधिक रुग्णालये या योजनेच्या पॅनेलमध्ये असून, तरीही काही वेळा रुग्णालये उपचार करण्यास नकार देतात.
अशा वेळी लाभार्थी टोल फ्री नंबर 14555 किंवा ऑनलाईन पोर्टलवर तक्रार करू शकतो.
Ayushman Bharat Yojana: देशातील गरीब व गरजू लोकांसाठी केंद्र सरकारकडून आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन-आरोग्य योजना राबवली जात आहे. जुलै 2025 पर्यंत या योजनेअंतर्गत तब्बल 41 कोटी नागरिकांचे आयुष्मान कार्ड बनवण्यात आले आहेत. या कार्डच्या माध्यमातून एखाद्या लाभार्थ्याला वर्षभरात 5 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळू शकतो.