
How to Become Debt Free: "कर्ज हे वाईट नाही, पण त्याचं योग्य नियोजन नसेल तर ते अडचणीचं ठरू शकतं," असं मत चार्टर्ड अकाउंटंट अभिजित कोळपकर यांनी व्यक्त केलं. सकाळ मिडिया आयोजित वेबिनारमध्ये ‘कर्जाचं स्मार्ट नियोजन कसं करावं?’ या विषयावर त्यांनी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन केलं.
या वेबिनारमध्ये कोळपकर यांनी कर्जाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. बचत, गुंतवणूक, कर्ज व्यवस्थापन आणि आर्थिक उद्दिष्टांचं नियोजन या सर्व गोष्टी समजून घेतल्यास, कर्ज आपल्या आर्थिक वाढीचं साधन ठरू शकतं, असं त्यांनी स्पष्ट केलं.