
पेट्रोल पंप सुरू करण्यासाठी 20 लाख (ग्रामीण) ते 50 लाख (शहरी) पर्यंत गुंतवणूक लागते, पण रोज 10-15 हजार रुपये निव्वळ नफा शक्य.
इंडियन ऑइल, बीपीसीएल, एचपीसीएल किंवा रिलायन्सकडून डीलरशिप घ्यावी लागते. अर्जदार भारतीय, 21-60 वयोगटातील असावा आणि मुख्य रस्त्यावर योग्य जागा (800-1600 चौ.मी.) असावी.
दिल्लीसारख्या शहरात प्रत्येक लीटर पेट्रोलवर पंप मालकाला 4.39 रुपये आणि डिझेलवर 3.02 रुपये कमिशन मिळते. रोजच्या विक्रीवर महिन्याला लाखोंची कमाई शक्य.
Petrol Pump Open Process: देशात गाड्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पेट्रोल-डिझेलची मागणी वाढत आहे. यामुळे शहरांपासून ते ग्रामीण भागांपर्यंत पेट्रोल पंप मालक चांगली कमाई करत आहेत. मात्र, पेट्रोल पंप सुरू करणे हे सोपे काम नाही; त्यासाठी मोठी गुंतवणूक, परवानगी प्रक्रिया आणि वेळ लागतो.