Dividend Stock: हिंदुस्तान युनिलिव्हर कंपनीचा मोठा निर्णय! भागधारकांना देणार 1800% डिव्हिडंड

Dividend Stock: ब्रोकरेजही कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक आहे.
HUL dividend 2023 Hindustan Unilever announces 1,800 percent payout check out record date
HUL dividend 2023 Hindustan Unilever announces 1,800 percent payout check out record date Sakal

Dividend Stock: एफएमसीजी सेक्टरमधील दिग्गज हिंदुस्तान युनिलिव्हर (HUL) ही सर्वात मोठी डिव्हिडेंड देणाऱ्या कंपन्यांपैकी एक आहे. कंपनी पुन्हा एकदा आपल्या शेअरधारकांना 1800 टक्के अंतरिम डिव्हिडेंड देणार आहे.

यासाठी कंपनीचे शेअर्स या आठवड्यात एक्स-डिव्हिडंडचे व्यवहार करतील. डिव्हिडेंडच्या बाबतीत हिंदुस्तान युनिलिव्हरचा ट्रॅक रेकॉर्ड मजबूत आहे. ब्रोकरेजही या शेअरबाबत सकारात्मक आहे.

हिंदुस्तान युनिलिव्हरने अलीकडेच आर्थिक वर्ष 2024 साठी दुसऱ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. यासह, कंपनीने 31 मार्च 2024 रोजी संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी 1 रुपये फेस व्हॅल्यूसह 18 रुपये डिव्हिडेंड देण्याची शिफारस केली आहे.

कंपनीने भागधारकांची पात्रता निश्चित करण्यासाठी 2 नोव्हेंबर 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. 16 नोव्हेंबर 2023 रोजी किंवा नंतर भागधारकांना डिव्हिडेंड दिला जाईल.

HUL dividend 2023 Hindustan Unilever announces 1,800 percent payout check out record date
Elon Musk: इलॉन मस्कच्या नव्या प्लॅनमुळे बँकांना मोठा धक्का! खाते सांभाळण्याची डोकेदुखी संपणार

आर्थिक वर्ष 2024 साठी दुसऱ्या तिमाहीत (Q2FY24) कंपनीने 2,717 कोटी रुपयांचा निव्वळ नफा कमावला, जो वार्षिक 4 टक्क्यांनी वाढला, तर विक्री 15,027 कोटी झाली.

एबिटदा वार्षिक 9% वाढून 3,694 कोटीवर पोहोचला, तर एबिटदा मार्जिन आर्थिक वर्ष 2024 साठी दुसऱ्या तिमाहीत (Q2FY24) मध्ये 130 बेस पॉईंट्सने वाढून 24.6% झाला आहे जो आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत (Q2FY23) 23.3% होता.

हिंदुस्तान युनिलिव्हरचे शेअर्स सध्याच्या किंमतीपेक्षा किमान 23.5 टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. 25 ऑक्टोबरला हा शेअर 0.074% च्या घसरणीसह 2484.60 रुपयांवर बंद झाला. रेलिगेअरला पुढील वाटचालीत शेअर 3068 रुपयांपर्यंत वाढण्याची आशा वाटत आहे.

HUL dividend 2023 Hindustan Unilever announces 1,800 percent payout check out record date
Rozgar Mela: PM मोदींनी 51,000 हून अधिक नियुक्ती पत्रांचे केले वाटप; म्हणाले तरुणांसाठी ही दिवाळी...

नोंद: क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com