
Hybrid Funds Investments
Sakal
ऑगस्ट 2025 मध्ये हायब्रिड फंड्सचे अॅसेट अंडर मॅनेजमेंट तब्बल ₹ 8.9 लाख कोटींवर पोहोचले.
आर्बिट्राज आणि मल्टी-अॅसेट फंड्समध्ये सर्वाधिक गुंतवणूक झाली, तर बॅलन्स्ड अॅडव्हांटेज व इक्विटी सेव्हिंग्जची गती थोडी मंदावली.
हायब्रिड फंड्स गुंतवणूकदारांसाठी जोखीम आणि परताव्याचा संतुलित पर्याय ठरत आहेत.
Hybrid Funds Investments: म्युच्युअल फंडच्या जगात SIP करणारे बहुतांश गुंतवणूकदार इक्विटी फंड्स आणि डेट फंड्समध्येच गुंतवणूक करतात. इक्विटी फंड्स थेट शेअर बाजाराशी जोडलेले असतात. त्यामुळे चांगल्या परताव्याची शक्यता असते; पण रिस्क देखील तितकीच मोठी असते. दुसरीकडे, डेट फंड्स म्हणजे सरकारी रोखे आणि बाँड्समध्ये गुंतवणूक. यात रिस्क कमी असली तरी परतावा मर्यादित राहतो.