Entrepreneurs: IAS आणि IPS पदाच्या नोकरीला मारली लाथ; आज आहेत उद्योग जगतातील बादशहा

भारतात प्रशासकीय सेवा ही सर्वात प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते.
IAS Officers Become Entrepreneurs
IAS Officers Become EntrepreneursSakal

IAS Officers Become Entrepreneurs: भारतात, भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) ही सर्वात प्रतिष्ठित नोकरी म्हणून ओळखली जाते. बहुतांश विद्यार्थ्यांचे आयएएस होण्याचे स्वप्न असते, परंतु त्यात मोजक्याच विद्यार्थ्यांची निवड होते.

यात एकदा निवड झाली की इतर करिअरचा विचार करण्याची गरज नाही. मात्र, भारतात काही आयएएस आणि आयपीएस आहेत ज्यांनी नोकरी सोडून व्यवसाय सुरू केला आणि ते उद्योजक बनले.

सर्वात तरुण आयएएस अधिकारी रोमन सैनी

रोमन सैनी 2014 मध्ये सर्वात तरुण आयएएस अधिकारी बनले. त्यांनी पहिल्याच प्रयत्नात UPSC नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण केली. वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी एम्सची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि एमबीबीएस पूर्ण केले. डॉक्टर झाल्यानंतर त्यांनी NDDTCमध्ये मानसोपचारा क्षेत्रात काम केले.

आयएएस झाल्यानंतर त्यांची मध्य प्रदेशात जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली. यानंतर त्यांनी उद्योजक होण्यासाठी ही नोकरीही सोडली. त्यांनी Unacademy या ऑनलाइन कोचिंग प्लॅटफॉर्मची स्थापना केली आणि आज ते एक यशस्वी ऑनलाइन कोचिंग सेंटर बनले आहे.

पोलीस आयुक्तपदाची नोकरी सोडली

राजन सिंह यांनी त्यांच्या आठ वर्षांच्या सेवेत तीन वर्षे तिरुअनंतपुरमचे पोलिस आयुक्त म्हणून काम पाहिले होते. कॉर्पोरेटमध्ये हात आजमावण्यासाठी त्यांनी नोकरी सोडली.

2016 मध्ये, त्यांनी Conceptowl कोचिंग प्लॅटफॉर्म लाँच केले, एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे जे विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षांसाठी तयारी करुन घेते.

स्वस्त आरोग्य सेवेसाठी आयएएस पद सोडले

व्यवसायाने डॉक्टर असलेले सय्यद सबहत अजीम 2000 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. नंतर त्यांनी आयएएस सेवा सोडली आणि ग्लोकल हेल्थकेअर सिस्टम सुरू केली. ही एक आरोग्य सेवा साखळी आहे जी स्वस्त आरोग्य सेवा प्रदान करते. Glocal ची देशात 11 रुग्णालये आहेत.

IAS Officers Become Entrepreneurs
Gold Rates: सोन्याच्या भावात 2,500 रुपयांची घसरण; गुंतवणूक करण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?

भाज्यांच्या स्टार्टअपसाठी आयएएस पद सोडले

प्रवेश शर्मा हे 1982 च्या बॅचचे आयएएस अधिकारी होते. त्यांनी 2016 मध्ये त्यांच्या सेवेतून स्वेच्छेने निवृत्ती घेतली आणि सब्जीवाला हा किरकोळ फळे आणि भाज्यांचा स्टार्टअप सुरू केला. सर्वांना वाजवी दरात सुविधा उपलब्ध करून देणे हा त्यांचा उद्देश होता.

IAS Officers Become Entrepreneurs
Success Story : अन् त्याने शिक्षणासाठी डोंगरावर मात केली सचिनचा संघर्ष वाचायलाच हवा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com