
Summary
आयसीआयसीआय बँकेने नवीन बचत खात्यांसाठी किमान शिल्लक रक्कम १ ऑगस्ट २०२५ पासून मोठ्या प्रमाणात वाढवली.
रिझर्व्ह बँकेने किमान शिल्लक रक्कम ठरवण्याचा निर्णय प्रत्येक बँकेवर सोपवला आहे.
नवीन नियम फक्त नवीन खातेधारकांना लागू होतील, अटी न पाळल्यास दंड आकारला जाईल.
RBI Governor On ICICI Bank Minimum Balance : बॅंकांच्या मिनिमन बॅलन्स नियमांत हस्तेक्षेप करण्यास रिझर्व्ह बॅंकेने नकार दिला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने बँकांना किमान किती रक्कम निश्चित करायची हे ठरवण्याचा अधिकार सोपवले. आयसीआयसीआय बँकेने १ ऑगस्ट २०२५ पासून उघडल्या जाणाऱ्या नवीन बचत खात्यांसाठी सरासरी मासिक शिल्लक रक्कम ५०,००० रुपये केली आहे, अशा वेळी आरबीआयचे गव्हर्नरांचे हे विधान आले आहे.