

ICICI Bank New Rules: Cash Withdrawal Charges to Rise From December 1, EMI Bounce Penalty Revised
eSakal
ICICI Bank cash withdrawal charges: तुमचं ICICI बँकेत सेव्हिंग अकाउंट असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. बँकेने 1 डिसेंबर 2026 पासून बचत खात्याशी संबंधित काही सर्व्हिस चार्जमध्ये बदल करण्याची घोषणा केली आहे. या बदलांमुळे ठरावीक मर्यादेपेक्षा जास्त रोख व्यवहार केल्यास ग्राहकांना अधिक शुल्क द्यावं लागू शकतं. तसेच, खात्यात पुरेशी रक्कम नसल्यामुळे EMI, विम्याचा प्रीमियम किंवा इतर ऑटोमॅटिक पेमेंट फेल झाल्यास दंडही आकारला जाऊ शकतो. जाणून घेऊया, हे नवे नियम काय आहेत आणि त्याचा तुमच्या खिशावर कसा परिणाम होऊ शकतो.