Mutual Fund: तुम्हाला लाँग टर्ममध्ये जास्त रिटर्न मिळवायचा असेल तर 'या' म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करा

दीर्घ मुदतीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी खूप कसरत करावी लागते.
Mutual Fund
Mutual FundSakal

Mutual Fund Investment: म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबत लोकांच्या मनात अनेक प्रश्न असतात. यासोबतच लोकांना दीर्घ मुदतीसाठी योग्य म्युच्युअल फंड निवडण्यासाठी खूप संघर्ष करावा लागतो. समजा तुम्ही 2021 मध्ये SIP द्वारे ICICI म्युच्युअल फंड (MF) मध्ये सुमारे 1.4 लाख रुपयांची गुंतवणूक केली आहे.

काही कारणास्तव गेल्या 1.5 वर्षांतील खराब कामगिरीमुळे तुमचे म्युच्युअल फंड सध्याचे सुमारे 1.1 लाख रुपयांचे गुंतवणूक मूल्य गाठले आहे.

अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडचे मुल्य खाली का घसरले आणि कोणत्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे योग्य आहे हे जाणून घेणे फार महत्वाचे आहे.

दीड वर्षात बाजारात चढ-उतार:

ऑक्टोबर 2021मध्ये शेअर बाजार BSE सेन्सेक्स 61,000 च्या जवळ पोहोचला होता. या दीड वर्षात बाजारात चढ-उतारही पाहायला मिळाले. यामुळे परतावा अपेक्षेपेक्षा कमी मिळण्याची शक्यता आहे.

काही गुंतवणूकदार मालमत्ता व्यवस्थापन कंपनी (AMC) चे नाव आणि ब्रँड पाहून गुंतवणूक करतात. प्रत्येक AMC मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फंड असतात जे वेगवेगळे उद्दिष्टे ठेवून त्यामध्ये गुंतवणूक केली जाते.

Mutual Fund
Share Market Opening: जागतिक बाजारातील घसरणीचा परिणाम, सेन्सेक्समध्ये 200 अंकांची घसरण, आयटी शेअर्समध्ये...

खराब कामगिरीचा धोका कमी करण्यासाठी आणि कोणत्याही एका फंडावर जास्त अवलंबून राहणे टाळण्यासाठी तुमच्या गुंतवणुकीत विविधता आणणे खूप महत्वाचे आहे.

दीर्घ मुदतीसाठी एसआयपीद्वारे गुंतवणूक करणे हा एक चांगला मार्ग असेल. कोणत्याही गुंतवणूकदाराने दीर्घ मुदतीसाठी इक्विटी फंडात गुंतवणूक करावी. येथे पाच वर्षांपेक्षा जास्त कालावधीच्या गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळू शकतो.

तुम्ही या फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता:

  • पराग पारिख फ्लेक्सिकॅप फंड

  • SBI लार्ज आणि मिड कॅप फंड

  • एचडीएफसी फ्लेक्सिकॅप फंड

  • कोटक इमर्जिंग इक्विटी फंड

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com