
थोडक्यात:
पोस्ट विभागाने तीन वर्षांपासून निष्क्रिय लहान बचत खाती ‘फ्रीज’ करण्याचा निर्णय घेतला आहे.
फ्रीज झाल्यानंतर अशा खात्यांमधून कोणतेही व्यवहार करता येणार नाहीत.
खाते अनफ्रीज करण्यासाठी KYC कागदपत्रांसह पोस्ट ऑफिसमध्ये जावे लागेल.
Small Savings Schemes: पोस्ट विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. विभागाने जाहीर केले की ज्यांची छोटी बचत खाती (Small Savings Schemes) मुदतपूर्तीच्या (maturity) तीन वर्षांनीही ना पुढे चालू आहेत, ना बंद केली गेली आहेत, अशा खात्यांना आता ‘फ्रीज’ करण्यात येणार आहे. याचा अर्थ असा की, अशा खात्यांमधील सर्व व्यवहार त्वरित थांबवले जातील.