Holiday Plan : ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ची वाढती पसंती

साधारणतः एप्रिल-मे महिना उजाडला; मुलांना सुट्ट्या लागल्या, की घरातील सर्वांना वेध लागतात ते बाहेर फिरायला जाण्याचे. आताच्या धकाधकीच्या आयुष्यात, तर असा विरंगुळा, बदल किंवा विश्रांती अपरिहार्य आहे.
Holiday Plan
Holiday Plansakal

साधारणतः एप्रिल-मे महिना उजाडला; मुलांना सुट्ट्या लागल्या, की घरातील सर्वांना वेध लागतात ते बाहेर फिरायला जाण्याचे. आताच्या धकाधकीच्या आयुष्यात, तर असा विरंगुळा, बदल किंवा विश्रांती अपरिहार्य आहे. अशा सहलीमुळे प्रत्येकाची ठरावीक दैनंदिन चक्रामधून काही काळासाठी का होईना सुटका होते. घरातील सर्वजण एकत्र येऊन मजा करतात, आनंद लुटतात, त्यामुळे सर्वांनाच नवी ऊर्जा, चैतन्य मिळते. प्रत्येक जण ताजेतवाना होऊन नव्याने दैनंदिन आयुष्यातील धकाधकीला तोंड देण्यासाठी सज्ज होतो, त्यामुळे अशा लहान-मोठ्या सहलीसाठी सर्वजण आसुसलेले असतात.

अनेक लोक नियमितपणे दर सहा महिन्यांनी दूरच्या ठिकाणी सहलीला जातात किंवा वर्षातून एकदा किंवा दोनदादेखील परदेश सहल करणे पसंत करतात. यासाठी योग्य आर्थिक नियोजन महत्त्वाचे आहे. आपल्या देशात असो किंवा परदेशात सहलीसाठी मोठ्या रकमेची गरज असते. योग्य नियोजन केल्यास दरवर्षीच्या सहली अगदी सहजपणे करणे शक्य आहे. यासाठी एक अभिनव उपाय आहे, तो म्हणजे ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’चा. सहलींच्या आर्थिक नियोजनासाठी ही एक अनोखी संकल्पना आता रुजू पाहत आहे.

मध्यंतरी एका टूर कंपनीची जाहिरात होती, की तुम्ही हॉलिडे प्लॅन करा, पैसे टप्प्याटप्प्याने दर महिन्याला भरा एक वर्षासाठी. अशी ही ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ची संकल्पना म्युच्युअल फंडाच्या ‘एसआयपी’च्या धर्तीवर मांडण्यात आली आहे. ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ अंतर्गत आपण दरमहा एक ठराविक रक्कम गुंतवून वर्षाअखेरीस किंवा आपल्या ‘ड्रीम डेस्टिनेशन’ला जाण्यासाठी आवश्‍यक रक्कम जमा करण्याचे नियोजन करून, ती रक्कम जमा झाल्यानंतर आपले स्वप्न पूर्ण करू शकतो.

महत्त्वाच्या बाबी

 सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ केल्यास लोकांना अनेक ठिकाणी फिरायला जाण्याचे आर्थिक नियोजन किमान एक किंवा दोन वर्षे आधीपासूनच करता येईल. प्रत्येक महिन्याला ठराविक रक्कम बचत किंवा आवर्ती ठेव खात्यामध्ये जमा केली, तर एक चांगली रक्कम जमा होऊ शकते. परदेश सहलींचे मोठे खर्चही या पद्धतीने नियोजन करून सहज करता येतील.

प्राप्तिकर कायदा कलम २०६ सी (१जी) नुसार (०१ऑक्टोबर २०२३ पासून लागू) परदेशात फिरण्यासाठी ओव्हरसीज टूर पॅकेज घेतल्यास, टूर ऑपरेटरने ७ लाख रुपयांपर्यंत ५ टक्के व ७ लाख रुपयांहून अधिक रकमेवर २० टक्के कर सरकारकडे जमा करणे बंधनकारक आहे.वस्तू व सेवाकर (जीएसटी) अंतर्गत टूर बुकिंगवर ५ टक्के कर लागतो. ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ अंतर्गत या करांमुळे वाढणाऱ्या खर्चाचेही नियोजन करणे शक्य आहे.

सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’मुळे आपण सहलीचे पूर्वनियोजन करतो. छोटे-छोटे खर्च कमी करून, बचत करू शकतो, त्या पैशातून एक किंवा दोन वर्षांत मोठी सहल करू शकतो. ‘एसआयपी’प्रमाणे ‘सिस्टिमॅटिक हॉलिडे प्लॅन’ हीदेखील काळाची गरज आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com