

Who Should Use 5kg LPG Cylinders? : अमेरिका इराण तणावामुळे हॉर्मुजची सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक कमी झाली. यामुळे भारतातसह अनेक देशात तेल आणि गॅसचे संकट उभा राहिले आहे. भारतात एलपीजीचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मोठ्या सिलिंडरसोबतच ५ किलोच्या छोट्या एलपीजी सिलिंडरची विक्री सुरू करण्यात आली आहे.२३ मार्चपासून आतापर्यंत ५-किलो वजनाचे १३ लाखांहून अधिक सिलिंडर्स विकले गेले आहेत.