
Raghuram Rajan On Indian Economy: भारताच्या अर्थव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे असे वक्तव्य आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केले आहे. त्यांनी ब्लूमबर्ग टीव्हीला मुलाखत दिली आहे. राजन यांच्या मते विकास दर अजूनही त्याच्या क्षमतेपेक्षा कमी आहे. अर्थशास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की डिसेंबर तिमाहीत विकास दर 6% पेक्षा किंचित जास्त असेल. हा विकास दर जुलै-सप्टेंबर तिमाहीतील 5.4% पेक्षा चांगला आहे.