

GST Collection Jumps to ₹1.93 Lakh Crore Ahead of Union Budget, Boosting Economic Confidence
eSakal
नवी दिल्ली: वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) संकलनाच्या आकडेवारीने सरकारला दिलासा दिला आहे. जानेवारी महिन्यात जीएसटी महसूलात लक्षणीय वाढ नोंदवली गेली असून, आयातीवरील करात झालेल्या वाढीमुळे एकूण संकलन ६.२ टक्क्यांनी उंचावले आहे. यामुळे कराचे आकडे ₹१.९३ लाख कोटींवर पोहोचले आहेत. दुसरीकडे, कर परताव्यात ३.१ टक्क्यांची घट झाली असून, ते ₹२२,६६५ कोटी इतके राहिले आहेत.