
आज महिन्याच्या सुरुवातीला व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये बदल झाले आहेत.. यावेळी १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत ५८.५० रुपयांची कपात करण्यात आली आहे. हे नवीन दर १ जुलैपासून म्हणजेच आजपासून देशभरात लागू होतील. दिल्लीत १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किरकोळ विक्री किंमत आजपासून १६६५ रुपये होईल. १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही.