
Rupee Vs USD: पतधोरण बैठकीत रिझर्व्ह बँकेकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता असल्याने आज रुपयाने अमेरिकी डॉलरच्या तुलनेत आणखी १५ पैशांनी गटांगळी खाल्ली आणि ८७.५८ चा सार्वकालिक नीचांक गाठला. या वर्षी आतापर्यंत रुपया दोन टक्क्यांहून अधिक घसरला आहे. एक जानेवारी २०२४ रोजी, डॉलरच्या तुलनेत रुपया ८३.२१ वर होता, तर एक जानेवारी २०२५ रोजी डॉलरच्या तुलनेत रुपया ८५.६४ वर आला होता. या वर्षी आतापर्यंत रुपया १९४ पैशांनी घसरला आहे. या घसरणीमुळे रुपया सर्वांत वाईट कामगिरी करणाऱ्या आशियाई चलनांपैकी एक ठरला आहे.