
Rupee Record Low: केंद्रीय अर्थसंकल्प 2025 सादर केल्याच्या दोन दिवसानंतर डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयात ऐतिहासिक घसरण झाली आहे. रुपया प्रथमच 87 रुपयांच्या वर गेला आहे. चलन बाजाराच्या सुरुवातीला, डॉलरच्या तुलनेत रुपया 42 पैशांच्या घसरणीसह 87.06 वर उघडला, तर व्यवहार सुरू झाल्यानंतर 10 मिनिटांतच तो 55 पैशांवर आला.
एका डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाच्या घसरणीमुळे तो 87.12 रुपये प्रति डॉलरवर आला आहे. यामुळे भारत आयात करत असलेल्या वस्तू महाग होऊ शकतात. याचा परिणाम सर्वसामान्यांवर होणार आहे.