Indian Startup Layoff: भारतीय स्टार्टअप्सनी गेल्या 2 वर्षात 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता

Indian Startup Layoff: भारतातील अनेक कंपन्यांनी नवीन नोकरभरती थांबवली आहे.
Indian Startup Layoff
Indian Startup LayoffSakal

Indian Startup Layoff: आर्थिक मंदीचा परिणाम विविध क्षेत्रांवर होताना दिसत आहे. अलीकडच्या गेल्या काही महिन्यांत अनेक लहान-मोठ्या कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.

2022 च्या सुरुवातीपासून भारतीय स्टार्टअप्सने कर्मचारी कपातीचा 30,000 चा टप्पा ओलांडला आहे, बायजूने या आठवड्यात कर्मचारी कपातीची घोषणा केल्यानंतर 4,000 हून अधिक कर्मचाऱ्यांवर परिणाम होणार आहे.

2022 पासून आजपर्यंत, अंदाजे 95 स्टार्टअप्सनी जवळपास 31,965 कर्मचार्‍यांना काढून टाकले आहे, याचे कारण कंपनीच्या खर्चात कपात करणे आणि नफ्याला प्राधान्य देणे हे आहे. असे वृत्त मनीकंट्रोलने दिले आहे.

Indian Startup Layoff
Air India: एअर इंडियाने रचला इतिहास, अगोदर A350 विमानाचे अधिग्रहण केले पूर्ण, आता...

2023 मध्ये, अंदाजे 49 स्टार्टअप्सनी जवळपास 13,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. या कर्मचारी कपातीची संख्या जास्त असू शकते, कारण अनेक स्टार्टअप्सने कर्मचारी कपातीची माहिती दिली नाही.

रिपोर्ट्सनुसार, 2022 पासून 30,000 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. अनेक छोट्या-मोठ्या टेक कंपन्यांनीही कर्मचारी कपात जाहीर केली आहे आणि नवीन नोकरभरती थांबवली आहे.

ज्या कंपन्यांनी कोरोनाच्या काळात ऑनलाइन व्यवसायातून भरघोस उत्पन्न मिळवले आहे त्यांचाही यामध्ये समावेश आहे. भारतातील आयटी कंपन्यांनीही नवीन नोकरभरती थांबवली आहे.

Indian Startup Layoff
Adani Group: गौतम अदानींना मोठा धक्का; 'ही' कंपनी अदानी ग्रुपमधील हिस्सेदारी विकणार, काय आहे प्रकरण?

कर्मचारी कपातीचे हे प्रमुख कारण आहे

खरे तर जगभरातील आणि भारतातील कंपन्या आर्थिक मंदीमुळे घाबरल्या आहेत. अगोदर कोरोना लॉकडाऊन आणि रशिया-युक्रेन युद्धामुळे जागतिक बाजारपेठेतील वाढत्या अनिश्चिततेमुळे अनेक कंपन्यांनी नोकरभरती थांबवली आहे आणि मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना कामावरून काढण्यास सुरुवात केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com