Direct Tax Collection: मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी! प्रत्यक्ष कर संकलनात 17.7 टक्के वाढ; तिजोरीत 'इतक्या' कोटींची भर

CBDT Data: मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारचे कर उत्पन्न सातत्याने वाढत आहे. मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 17.7 टक्क्यांनी वाढून 19.58 कोटी रुपये झाले आहे.
India’s direct tax collection surges by 17.7 percent to Rs 19.58 lakh crore, says tax department
India’s direct tax collection surges by 17.7 percent to Rs 19.58 lakh crore, says tax departmentSakal

CBDT Data: मोदी सरकारसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारचे कर उत्पन्न सातत्याने वाढत आहे. मार्च 2024 ला संपलेल्या आर्थिक वर्षात भारताचे निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन वार्षिक आधारावर 17.7 टक्क्यांनी वाढून 19.58 कोटी रुपये झाले आहे. आयकर विभागाने रविवारी (21 एप्रिल) सांगितले की, ही रक्कम अंदाजापेक्षा खूपच जास्त आहे.

2023-24 या आर्थिक वर्षातील प्रत्यक्ष कर संकलनाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, निव्वळ संकलन 19.58 लाख कोटी रुपये आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा 16.64 कोटी रुपये होता. म्हणजेच गेल्या एका वर्षात निव्वळ संकलन 17.7 टक्क्यांनी वाढले आहे. अर्थसंकल्पात 18.23 लाख कोटी रुपयांच्या कर संकलनाचा अंदाज होता, तो सुधारित करून 19.45 लाख कोटी करण्यात आला.

India’s direct tax collection surges by 17.7 percent to Rs 19.58 lakh crore, says tax department
Elon Musk India: इलॉन मस्क भारतात गुंतवणूक करण्यास उशीर का करत आहेत? यामागे चीन तर नाही ना?

प्रत्यक्ष कराचे एकूण संकलन 23.37 लाख कोटी रुपये आहे. गेल्या वर्षीच्या 19.72 लाख कोटी रुपयांच्या तुलनेत 18.48 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकूण कॉर्पोरेट कर संकलन 11.32 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 13.06 टक्क्यांनी वाढले आहे. निव्वळ कॉर्पोरेट कर संकलन 9.11 लाख कोटी रुपये आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 10.26 टक्क्यांनी वाढले आहे.

India’s direct tax collection surges by 17.7 percent to Rs 19.58 lakh crore, says tax department
Fake App : हॅकर्सनी प्रसिद्ध बँकेच्या नावाने तयार केलं फेक अ‍ॅप; खोट्या ट्रेडिंग अ‍ॅप्सचाही सुळसुळाट.. सरकारचा इशारा!

गेल्या आर्थिक वर्षात सकल वैयक्तिक आयकर संकलन 24.26 टक्क्यांनी वाढून 12.01 लाख कोटी रुपये झाले आहे. 2022-23 या आर्थिक वर्षात हा आकडा 9.67 लाख कोटी रुपये होता.

2023-24 या आर्थिक वर्षात निव्वळ वैयक्तिक आयकर संकलनात 25.23 टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि 10.44 लाख कोटी रुपयांचा आकडा पार केला आहे. मागील आर्थिक वर्षात हीच रक्कम 8.33 लाख कोटी रुपये होती. CBDT नुसार, 2023-24 या आर्थिक वर्षात 3.79 लाख कोटी रुपयांचा परतावा देखील जारी करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com