
GST on Health Insurance
Sakal
जीएसटी परिषदेने आरोग्य आणि जीवन विम्यावरचा 18% जीएसटी शून्यावर आणला आहे, जो 22 सप्टेंबर 2025 पासून लागू होणार आहे.
पण, एका अहवालानुसार विमा कंपन्यांनी आयटीसीचा लाभ गमावल्याने प्रीमियम 3–5% वाढणार.
त्यामुळे ग्राहकांना अपेक्षित फायदा होणार नाही.
GST on Health Insurance: जीएसटी परिषदेच्या 56व्या बैठकीत आरोग्य आणि जीवन विमा पॉलिसींवरील जीएसटी दर 18% वरून थेट शून्यावर आणण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजेच, 22 सप्टेंबर 2025 पासून हेल्थ आणि लाइफ इन्शुरन्सवर कोणताही जीएसटी लागणार नाही. हा निर्णय जाहीर होताच सर्वसामान्यांमध्ये आनंदाची लाट पसरली होती.