ITR return
Sakal
ITR Risk Management : मागील काही दिवसांपासून करदाते आपल्या इनकम टॅक्स रिटर्न (ITR) ची वाट पाहून आहेत. यातच आता या आठवड्यात आयकर विभागाकडून आलेल्या एका नव्या संदेशामुळे अनेक करदात्यांमध्ये गोंधळ आणि चिंता निर्माण झाली आहे. अनेक लोकांना हा संदेश मिळाला असून, त्यामध्ये त्यांच्या ITR रिफंडचा दावा हा ‘Risk Management Process’ (जोखीम व्यवस्थापन प्रक्रिया) मध्ये आढळून आल्यामुळे आणि काही विसंगतींमुळे त्यांची आयकर रिटर्नची प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली असल्याचे ई-मेल किंवा SMS द्वारे सांगण्यात येत आहे.