revised ITR filing last date 31 Dec
Sakal
how to avoid ₹5,000 ITR penalty : डिसेंबर महिन्यातील मागच्या काही दिवसांत अनेक आयकरदात्यांना आयकर विभागाकडून ई-मेल आणि मोबाईल संदेश (SMS) पाठवण्यात आले आहेत. या संदेशांमध्ये त्यांना कळवण्यात आले आहे की, त्यांचा इनकम टॅक्स रिफंड सध्या थांबवण्यात आला आहे, कारण रिफंडसाठी त्यांनी केलेले दावे आयकर विभागाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीशी जुळत नाहीत. अशा करदात्यांना त्यांच्या रिटर्नमधील चुका दुरुस्त करण्यासाठी सुधारित इनकम टॅक्स रिटर्न (Revised ITR) दाखल करण्याचा सल्ला आयकर विभागाने दिला आहे.