
पंतप्रधान जनधन योजनेला ११ वर्षे पूर्ण झाले असून या योजनेंतर्गत उघडलेल्या खात्यांची संख्या ११ वर्षात तब्बल ५६ कोटींच्या वर पोहोचली आहे. तर खात्यात २.६८ लाख कोटी जमा झाले आहेत. जनधन खात्यावर खातेधारकांना अनेक सुविधा दिल्या जातात. यातच एक सुविधा ओव्हरड्राफ्टची आहे. आता यात वाढ करण्यात आली असून यामुळे खातेधारकांना मोठा फायदा होणार आहे.