

January Bank Holidays 2026
Sakal
Maharashtra Bank Holiday : २०२६ वर्ष सुरू व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. याच पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने २०२६ वर्षासाठीचे बँक सुट्ट्यांचे अधिकृत कॅलेंडर जाहीर केले आहे. या कॅलेंडरनुसार वर्षाच्या पहिल्याच महिन्यात म्हणजे जानेवारीत बँका तब्बल १६ दिवस बंद राहणार आहेत. मात्र, या सर्व सुट्ट्या सगळीकडे सारख्या नसल्याने एकाच वेळी देशभर बँका बंद राहणार नाही.