JSW group
JSW group Sakal

JSW Group: सज्जन जिंदाल यांचा मोठा निर्णय! 40,000 कोटींचा ईव्ही प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवणार

JSW Group: JSW समुहाने नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल सरकारसोबत इलेक्ट्रिक वाहन उद्योग ओडिशामध्ये स्थापन करण्याचा करार केला होता. पण अवघ्या सात महिन्यांनी आपला प्रस्तावित 40,000 कोटींचा इलेक्ट्रिक वाहन (EV) महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय घेतला आहे.
Published on

JSW Group: JSW समुहाने नवीन पटनायक यांच्या नेतृत्वाखालील बिजू जनता दल सरकारसोबत इलेक्ट्रिक वाहन उद्योग ओडिशामध्ये स्थापन करण्याचा करार केला होता. पण अवघ्या सात महिन्यांनी आपला प्रस्तावित 40,000 कोटींचा इलेक्ट्रिक वाहन (EV) आणि बॅटरी प्रकल्प ओडिशातून महाराष्ट्रात हलवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.

सज्जन जिंदाल यांच्या नेतृत्वाखालील समूह आता औरंगाबाद आणि नागपूरमध्ये आपला ईव्ही आणि संबंधित प्रकल्प हलवण्याचा विचार करत आहे. पूर्वेकडील राज्यात राजकीय बदल झाल्यानंतर कंपनीने आपल्या योजनांमध्ये बदल केला आहे.

JSW group
Anmol Ambani: अनिल अंबानींचा मुलगा अनमोलवर सेबीची मोठी कारवाई; ठोठावला एक कोटी रुपयांचा दंड, काय आहे प्रकरण?

फेब्रुवारीमध्ये, जिंदाल समूहाने ओडिशामधील कटक आणि पारादीप येथे ईव्ही आणि बॅटरी उत्पादन प्रकल्प उभारण्यासाठी ओडिशा सरकारसोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली होती. कंपनीने मेगा प्लांटसाठी 40,000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असल्याचे सांगितले होते.

JSW group
F&O Traders: फ्युचर्स आणि ऑप्शन्समध्ये गुंतवणूक करताय सावधान! गेल्या तीन वर्षात गुंतवणूकदारांचे 1.81 लाख कोटी पाण्यात

गुजरात आणि महाराष्ट्र ही पश्चिमेकडील राज्ये सेमीकंडक्टर आणि इलेक्ट्रिक वाहने यांसारख्या सेक्टरमध्ये मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी स्पर्धा करत आहेत.

मोठ्या कंपन्या मोठे प्रकल्प राज्यात आणताना राजकीय स्थिरता आणि सुरक्षितता आहे का याचा विचार करतात. 2008 मध्ये, टाटा समूहाने भूसंपादनाच्या विरोधात हिंसक आंदोलनानंतर टाटा नॅनो तयार करण्याचा नियोजित प्रकल्प पश्चिम बंगालमधून गुजरातमध्ये हलवला होता.

कंपनीने अलीकडेच एमजी मोटर इंडियाची मालकी असलेली कंपनी SAIC मोटर सोबत जॉइंट व्हेंचर करार केला आहे, ज्यात 35% स्टेक आहे. हा उपक्रम इलेक्ट्रिक वाहनांचा आहे. कंपनीने सांगितले की 40,000 कोटींची दोन वेगवेगळ्या टप्प्यात गुंतवणूक केली जाईल. या गुंतवणुकीमुळे 11,000 लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com