थोडक्यात
लाडकी बहिण योजनेच्या पडताळणीत निकष पूर्ण न केल्याने ४२ लाख महिलांचे अर्ज रद्द झाले.
साडे नऊ हजार सरकारी कर्मचारी महिलांनी आणि उत्पन्नाची खोटी माहिती देणाऱ्या महिलांचे अर्ज बाद.
चार चाकी वाहन असलेल्या महिलांना योजनेच्या लाभापासून वगळण्यात आले.
नेहमी कोणत्या न कोणत्या कारणावरुन चर्चेत असेलल्या लाडकी बहिण योजनेबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेच्या पडताळणीमध्ये लाखों महिलांचे अर्ज बाद करण्यात आले आहेत. आता या महिलांना लाडकी बहिण योजनेचा यापुढे कधीच लाभ घेता येणार नाही. या महिलांनी निकष पूर्ण न केल्यामुळे हे अर्ज बाद केले जात असल्याची माहिती समोर आली आहे.