Land Deal Case: बँकेच्या तळघरात पाणी गेल्याने रॉबर्ट वाड्रांच्या कंपनीची कागदपत्रे गहाळ, SIT ची बँकेला नोटीस

रॉबर्ट वाड्रा यांच्या 2008 आणि 2012 या वर्षातील महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत.
Land Deal Case robert vadra
Land Deal Case robert vadraSakal

Robert Vadra News: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्याविरोधात नोंदवलेल्या एफआयआरशी संबंधित तपासात एसआयटीला धक्कादायक माहिती मिळाली आहे.

युनियन बँक ऑफ इंडियाने हरियाणा पोलिसांच्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) सांगितले आहे की, शाखेच्या तळघरात पाणी साचल्यामुळे रॉबर्ट वाड्रा यांच्या 2008 आणि 2012 या वर्षातील महत्त्वाच्या आर्थिक व्यवहारांची कागदपत्रे गहाळ झाली आहेत.

एसआयटी रॉबर्ट वाड्रा आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा यांच्या विरोधात भ्रष्ट रिअल इस्टेट व्यवहारात दाखल करण्यात आलेल्या एफआयआरची चौकशी करत आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हा मुद्दा गाजला होता. भाजपने या मुद्द्याचा वापर करून काँग्रेसला लक्ष्य केले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, एसआयटीने युनियन बँक ऑफ इंडियाच्या गुरुग्राममधील न्यू फ्रेंड्स कॉलनी शाखेतून वाड्रा यांच्या कंपनीच्या खात्यातील आर्थिक व्यवहारांची माहिती मागवली होती.

26 मे रोजी बँकेने कळवले की, शाखेच्या तळघरात पाणी साचल्याने 2008 आणि 2012 मधील वरील सर्व कागदपत्रे गहाळ झाली आहेत.

याप्रकरणी बँकेच्या उत्तराची प्रतीक्षा आहे. या प्रकरणाची चौकशी 1 सप्टेंबर 2018 रोजी सुरू झाली, जेव्हा हरियाणातील भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने हुडा, वाड्रा, रिअल इस्टेट क्षेत्रातील दिग्गज DLF, ओंकारेश्वर प्रॉपर्टीज आणि स्कायलाइट हॉस्पिटॅलिटी यांना जमिनीच्या व्यवहारात आरोपी पक्ष म्हणून FIR दाखल केला होता.

Land Deal Case robert vadra
Johnson And Johnson: 'जॉन्सन अँड जॉन्सन' कंपनीला कोर्टाने ठोठावला 154 कोटींचा दंड, काय आहे प्रकरण?

या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोप म्हणजे वाड्रा यांच्या स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने फेब्रुवारी 2008 मध्ये ओंकारेश्वर प्रॉपर्टीजकडून गुरुग्राममधील शिकोहपूर येथे 3.5 एकर जमीन 7.5 कोटी रुपयांना विकत घेतली होती.

त्यानंतर, व्यावसायिक परवाना मिळाल्यानंतर, कंपनीने तीच मालमत्ता डीएलएफला 58 कोटी रुपयांना विकली. जमिनीच्या व्यवहाराच्या बदल्यात हुडा सरकारने वजिराबाद, गुडगाव येथे डीएलएफला 350 एकर जमीन दिली, असाही आरोप आहे.

मानेसरच्या तहसीलदारांनी निदर्शनास आणून दिले की स्कायलाइट हॉस्पिटॅलिटीने 18 सप्टेंबर 2012 रोजी डीएलएफ युनिव्हर्सल लिमिटेडला 3.5 एकर जमीन विकली होती आणि व्यवहारादरम्यान कोणत्याही नियमांचे उल्लंघन केले गेले नाही.

Land Deal Case robert vadra
Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com