
Sun TV Group: भारतातील सर्वात मोठ्या मीडिया चॅनेलपैकी एक असलेल्या सन टीव्ही नेटवर्कमधील कौटुंबिक वाद समोर आला आहे. हा केवळ कोर्टरूम ड्रामा नाही तर हजारो कोटी रुपयांची सत्ता आणि नियंत्रणासाठीचा लढा आहे. या वादामुळे काव्या मारनचे वडील आणि काका समोरासमोर आले आहेत. हा वाद तब्बल 24 हजार कोटी रुपयांच्या साम्राज्याची सत्ता आणि मालकी कोणाकडे असणार, यावरून झाला आहे.