

LIC Suffers ₹11,000 Crore Loss After Cigarette Tax Hike Hits ITC Shares
Sakal
ITC Share Fall : केंद्र सरकारने सिगारेटवर उत्पादन शुल्क (एक्साइज ड्युटी) लावण्याची घोषणा केली असून, हे नवीन उत्पादन शुल्क 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहे. सिगारेट आणि तंबाखूजन्य उत्पादनांवर आधीच असलेल्या 40 टक्के GST व्यतिरिक्त हे शुल्क आकारले जाईल. सरकारच्या या निर्णयानंतर सिगारेट उत्पादन कंपन्यांच्या शेअर्समध्ये मोठ्या प्रमाणात घसरण झाली. गॉडफ्रे फिलिप्स आणि ITC लिमिटेड या कंपन्यांचे शेअर्स अवघ्या दोन दिवसांत 20 टक्क्यांहून अधिक घसरले आहेत.