Loan Rate : मोठी बातमी ! कर्जदारांना दिलासा, HDFC सह या बॅंकांनी कमी केले MCLR दर, EMI होणार कमी

Loan Rate : एचडीएफसी बँकेचा एक दिवसाचा आणि एक महिन्याचा एमसीएलआर ८.५५% वर कायम आहे, तर ३ महिन्यांचा एमसीएलआर ८.६०% वर आहे. बँकेने त्यांचे ६ महिन्यांचा आणि एक वर्षाचा एमसीएलआर दर ५ बेसिस पॉइंटने कमी केले.
HDFC Bank and other leading banks announce MCLR rate cuts, offering EMI relief to borrowers in September 2025.

HDFC Bank and other leading banks announce MCLR rate cuts, offering EMI relief to borrowers in September 2025.

Updated on

Summary

  1. HDFC, BoB, PNB, Indian Overseas Bank आणि BOI यांनी MCLR दर कमी केले, EMI कमी होणार.

  2. SBI आणि IDBI बँकांनी मात्र कोणताही बदल केलेला नाही.

  3. HDFC बँकेने 6 महिने आणि 1 वर्षासाठी 5 bps ने MCLR दर कपात केली आहे.

कर्जदारांना लवकरच थोडा दिलासा मिळू शकतो कारण अनेक प्रमुख बँकांनी त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स-बेस्ड लेंडिंग रेट (MCLR)मध्ये सुधारणा केली आहे. HDFC बँक, बँक ऑफ बडोदा , पंजाब नॅशनल बँक, इंडियन ओव्हरसीज बँक आणि बँक ऑफ इंडियाने सप्टेंबर २०२५ पर्यंतच्या निवडक कालावधीसाठी MCLR दरात कपात करण्याची घोषणा केली आहे, ज्यामुळे कर्जदारांचा EMI कमी होऊ शकतो किंवा कर्जाचा कालावधी कमी होऊ शकतो. दरम्यान, SBI आणि IDBI बँकेने त्यांचे यात कोणताही बदल केलेला नाही. त्यामुळे त्यांच्या कर्जदारांना सध्यातरी कोणताही दिलासा मिळणार नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com