
LPG Cylinder Price Hike: आज एलपीजी सिलिंडरच्या दरात वाढ करण्यात आली आहे. मोदी सरकारने 14 किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत 50 रुपयांनी वाढ केली आहे. त्यानंतर उज्ज्वला योजनेंतर्गत उपलब्ध असलेल्या एलपीजी सिलिंडरची किंमत 503 रुपयांवरून 553 रुपयांपर्यंत आणि उज्ज्वला योजना नसलेला एलपीजी सिलिंडर 803 रुपयांवरून 853 रुपयांपर्यंत वाढणार आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांना संबोधित करताना किंमती वाढवत असल्याचे सांगितले.