LPG Cylinder : गेल्या 4 वर्षात 56% ने महागला LPG सिलिंडर, सबसिडीतही मोठी घट, पाहा आकडेवारी

गेल्या चार वर्षांत सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे.
LPG Cylinder
LPG Cylinder Sakal

LPG Cylinder Price Hike : महागाईने सर्वसामांन्यांचे कंबरडे मोडले आहे. अन्नधान्यापासून ते भाजीपाल्यापर्यंत आणि पेट्रोल, डिझेलपासून ते खाद्य तेलापर्यंत सर्वच वस्तुंचे दर वाढले आहेत.

अलीकडेच महागाईचा आणखी एक झटका बसला आहे. तो म्हणजे एलपीजी सिलिंडरचा. एलपीजी सिलेंडरच्या दरात 50 रुपयांची वाढ झाली आहे. तर व्यावसायिक सिलेंडरही महागला आहे.

मात्र गेल्या चार वर्षांत सिलिंडरच्या किंमतीत सुमारे 56 टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. 1 एप्रिल 2019 रोजी घरगुती LPG सिलेंडरची (14.2 kg) किरकोळ विक्री किंमत 706.50 रुपये होती.

2020 मध्ये ती वाढून 744 रुपये झाली. यानंतर 2021 मध्ये 809 रुपये आणि 2022 मध्ये 949.50 रुपये झाली. या वर्षी 1 मार्च रोजी किंमत 1,053 रुपयांवरून आता 1,103 रुपये झाली आहे.

गेल्या काही वर्षांत घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किंमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच सरकारी आकडेवारी दर्शवते की गेल्या काही वर्षांत एलपीजीवरील एकूण अनुदानात लक्षणीय घट झाली आहे.

सबसिडी सतत कमी होत आहे :

गेल्या चार वर्षात सरकारने दिलेल्या एलपीजीवरील सबसिडीच्या आकडेवारीवरून असे दिसून येते की 2018-19 मध्ये सबसिडी 37,209 कोटी रुपये होती. 2019-20 मध्ये 24,172 कोटी रुपये, 2020-21 मध्ये 11,896 कोटी रुपये आणि 2021-22 मध्ये 1,811 कोटी रुपयांपर्यंत खाली आली आहे.

LPG Cylinder
Toll Tax Rate : वाहन चालकांना मोठा धक्का! महामार्गावरील टोल टॅक्सच्या दरात वाढ, जाणून घ्या नवे दर

पीएम उज्ज्वला योजनेंतर्गत 8 कोटी कनेक्शन दिले :

गरीब घरातील महिला सदस्यांना LPG कनेक्शन देण्यासाठी 2016 मध्ये प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) सुरू करण्यात आली होती, ज्या अंतर्गत 8 कोटी गॅस कनेक्शन देण्यात आले होते.

उज्ज्वला 2.0 अंतर्गत, सर्व PMUY लाभार्थ्यांना मोफत एलपीजी कनेक्शन व्यतिरिक्त स्टोव्ह दिला जातो. उज्ज्वला 2.0 अंतर्गत 1 फेब्रुवारी 2023 पर्यंत 1.6 कोटी कनेक्शन देण्यात आले आहेत.

कोविड-19 काळात सरकारने प्रधानमंत्री गरीब कल्याण पॅकेज (PMGKP) अंतर्गत 1 एप्रिल 2020 पासून उज्ज्वला लाभार्थ्यांना तीन मोफत LPG रिफिल देण्याची योजना जाहीर केली होती.

कंपन्यांचे मोठे नुकसान :

पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने असेही निदर्शनास आणून दिले की सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांना देशांतर्गत एलपीजीच्या विक्रीतून मोठे नुकसान झाले आहे.

या नुकसानाची भरपाई करण्यासाठी सरकारने अलीकडेच LPG कंपन्यांना 22,000 कोटी रुपयांची एकरकमी भरपाई मंजूर केली आहे.

LPG Cylinder
तुमच्याकडं कागदी स्वरुपातले शेअर आहेत? मग हे वाचाच....

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com