

Newly revised LPG cylinder prices showing reduced commercial cylinder rates across major Indian cities.
esakal
Summary
सरकारने १९ किलोच्या व्यावसायिक LPG सिलिंडरची किंमत पुन्हा कमी केली आहे.
या महिन्यापासून व्यावसायिक सिलिंडर १० रुपयांनी स्वस्त झाला आहे.
दिल्लीतील नवीन दर १५८०.५० रुपये, मुंबईत १५३१ रुपये, चेन्नईत १७३९.५० रुपये निश्चित झाले.
सरकारने १९ किलोग्रॅमच्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरची किंमत कमी केली आहे. नवीन दर आजपासून लागू झाला आहे. गेल्या महिन्यात व्यावसायिक सिलिंडरची किंमतही पाच रुपयांनी कमी करण्यात आली होती आता आणखी दहा रुपयांनी ही किंमत कमी करण्यात आली आहे. १४ किलोग्रॅमच्या घरगुती सिलिंडरच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. १९ किलोग्रॅमचा व्यावसायिक एलपीजी सिलिंडर आता दिल्लीत १५८०.५० रुपयांना उपलब्ध होईल, जो पूर्वी १५९०.५० रुपयांना होता. मुंबईत तो १५३१ रुपये झाला आहे आणि चेन्नईमध्ये १७३९.५० रुपये झाला आहे. कोलकातामध्ये आता १६८४ रुपये झाला आहे.