

LPG Price Today: Commercial Cylinder Gets Cheaper by ₹183! Check Latest Domestic Gas Rates
eSakal
LPG Cylinder Price Update: पश्चिम आशियातील तणाव शांत झाल्यानंतर काल 1 जुलै रोजी देशातील सरकारी तेल कंपन्यांनी कमर्शियल (व्यावसायिक) LPG गॅसचे दर 183.50 रुपयांनी स्वस्त केले. मागच्या 4 महिन्यांत कच्च्या तेलाच्या पुरवठा साखळीत आलेल्या अडथळ्यांमुळे पेट्रोल-डिझेल सोबत LPG गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली होती.मात्र आता पुरवठा साखळी पूर्वस्थितीत आल्याने घरगुती LPG वापरणाऱ्या ग्राहकांचे दर कधी कमी होतील याकडे लक्ष्य लागून आहे.