Made In India iPhone: टाटांची स्मार्टफोन मार्केटमध्ये एंन्ट्री! चीनला देणार टक्कर, आता भारतात बनवणार आयफोन

करार निश्चित झाल्यास टाटा कंपनी आयफोनची निर्मिती करणारी देशातील पहिली कंपनी बनेल.
tata group
tata groupsakal
Updated on

Made In India iPhone: देशातील दिग्गज उद्योगपती रतन टाटा यांचा टाटा समूह लवकरच मोबाईल फोन बनवण्याच्या व्यवसायात उतरणार आहे. टाटा समूह लवकरच आयफोनचे उत्पादन सुरू करू शकतो.

कंपनी Apple सप्लायर विस्ट्रॉन कॉर्पशी चर्चा करत आहे. लवकरच या दोन कंपन्यांमध्ये करार होऊ शकतो. हा करार निश्चित झाल्यास टाटा कंपनी आयफोनची निर्मिती करणारी देशातील पहिली कंपनी बनेल.

आयफोन निर्माता विस्ट्रॉनचा प्लांट कर्नाटकात आहे. करार झाल्यानंतर टाटा कर्नाटकातील प्लांट ताब्यात घेऊ शकतात.

1.8 अब्ज डॉलर किंमतीचे फोन बनवण्याचे उद्दिष्ट

तैवानची विस्ट्रॉन कंपनी इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवते. अलीकडेच, कंपनीने कर्नाटक प्लांटमधून यावर्षी 1.8 अब्ज डॉलर किंमतीचे आयफोन बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. कंपनी पुढील वर्षापर्यंत तिप्पट कर्मचारी वाढवण्यावरही भर देणार आहे.

विस्ट्रॉनला भारतातील आयफोन उत्पादनातून बाहेर पडायचे आहे. त्यानंतर आता टाटाने ही कंपनी खरेदी करण्यात रस दाखवला आहे. मात्र, टाटा, विस्ट्रॉन आणि अॅपलने याबाबत काहीही सांगण्यास नकार दिला आहे.

tata group
Bank Employees: सरकारी बँक कर्मचाऱ्यांचे पगार पुन्हा वाढणार! अर्थ मंत्रालयाने IBAला दिल्या विशेष सूचना

इकॉनोमिक टाइम्सच्या वृत्तानुसार, टाटा आणि विस्ट्रॉन यांच्यात चर्चा सुरू आहे. ते ऑगस्टमध्ये डील फायनल करू शकतात. टाटाचा हा करार झाला तर टाटा भारतात आयफोन बनवणारी पहिली कंपनी बनेल. यासोबतच मेड इन इंडिया iPhones लवकरच बाजारात दिसणार आहेत.

चीनशी स्पर्धा

सरकार विदेशी कंपन्यांना त्यांचे उत्पादन आणि कामगार वाढवण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कोरोनापासून पुरवठा समस्या, अमेरिका आणि चीनमधील वाढता तणाव यामुळे परदेशी कंपन्या चीनवर अधिक अवलंबून आहेत.

अशा परिस्थितीत विदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यासाठी पुढे येत आहेत. टाटा समूहाने अलीकडेच इलेक्ट्रॉनिक उत्पादनात प्रवेश केला आहे.

tata group
Indian Politics :पक्षाचे 'आयकॉन' पळवून भारतात निवडणूक जिंकता येईल का?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.