
Maharashtra Budget 2025: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्पपूर्व आर्थिक पाहणी अहवालानुसार, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था २०२४-२५ मध्ये ७.३ टक्क्यांनी वाढणार आहे. तसेच, भारतीय अर्थव्यवस्था ६.५ टक्के दराने वाढणार असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. महाराष्ट्राचा २०२३-२४ या वर्षासाठी प्रति व्यक्ती उत्पन्नाच्या बाबतीत देशात चौथा क्रमांक असून, तेलंगण पहिल्या स्थानी आहे.