
Petrol Diesel Vehicles in Mumbai: शहरातील हवेची खालावलेली गुणवत्ता लक्षात घेऊन महाराष्ट्र सरकार मुंबई महानगर क्षेत्रात पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी घालण्याच्या तयारीत आहे. पेट्रोल-डिझेल वाहनांवर बंदी आणल्यास केवळ सीएनजी आणि इलेक्ट्रिक वाहनांनाच चालवण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. यासाठी सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.