Government Scheme : फक्त महिलांसाठी आहे ही योजना; एका वर्षात मिळणार १५ हजार रुपये

महिला सन्मान बचत पत्र (MSSC) २०२५ पर्यंत २ वर्षांसाठी आहे. या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते.
Government Scheme
Government Schemegoogle

मुंबई : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी गुरुवारी अचानक पोस्ट ऑफिसमध्ये पोहोचल्या. अगदी सामान्य नागरिकासारख्या. येथे त्यांनी एका खास योजनेत खाते उघडले, जे फक्त महिलांसाठी आहे. (Mahila Samman Savings Certificate government scheme for women)

महिला सन्मान बचत प्रमाणपत्र असे या योजनेचे नाव आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती. महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ही एक वेळची छोटी बचत योजना आहे. महिला या योजनेत खाते उघडून त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळवू शकतात.

Government Scheme
Government Scheme : १.१९ कोटी नागरिकांनी का केली या योजनेत गुंतवणूक ? तुम्हालाही मिळेल हा लाभ

७.५ टक्के व्याजदर

महिला सन्मान बचत पत्र (MSSC) २०२५ पर्यंत २ वर्षांसाठी आहे. या बचत योजनेत ७.५ टक्के व्याज मिळते. महिला किंवा मुलीच्या नावाने महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये कोणीही गुंतवणूक करू शकते.

नफा किती होईल

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रामध्ये गुंतवणुकीची कमाल मर्यादा रु. २ लाख आहे. या योजनेत, गुंतवणूकदाराला ७.५ टक्के निश्चित व्याज दराने परतावा मिळतो. या योजनेत तुम्हाला एका वर्षात १५ हजार ४२७ रुपयांचा परतावा मिळेल.

दोन वर्षांत ३२ हजार ४४ रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे, या योजनेतील तुमची २ लाख रुपयांची गुंतवणूक दोन वर्षांत २.३२ लाख रुपये होईल.

Government Scheme
Pregnancy Test At Home : घरच्या घरी घ्या 'गोड बातमी'चा अंदाज

कोणताही धोका नाही

महिला सन्मान बचत प्रमाणपत्रातील तुमची गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित आहे. या योजनेला केंद्र सरकारचा पाठिंबा आहे. याशिवाय या योजनेत तुम्ही आंशिक पैसे काढू शकता.

त्रुटी

पोस्ट ऑफिस किंवा अधिकृत बँकेत छापील एमएससीसी पावती गोळा करण्यासाठी, तुम्हाला ४० रुपये भरावे लागतील. जर तुम्ही ऑनलाइन पावती घेतली तर तुम्हाला ९ रुपये द्यावे लागतील. त्याच वेळी, १०० रुपये टर्नओव्हर पेमेंटसाठी ६.५ पैसे आकारले जातील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com