
Mahindra & Mahindra: महिंद्र अँड महिंद्रा कंपनीचा मोठा निर्णय, महिलांसाठी पाच वर्षांची...
Mahindra & Mahindra unveils flexibility policy: आई होणे ही प्रत्येक स्त्रीसाठी आनंदाची भावना असते. प्रत्येक नोकरदार महिलेला तिच्या कामासोबतच पूर्ण वेळ आपल्या मुलाला द्यायचा असतो. त्यामुळे भारतात दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये नोकरदार महिलांसाठी प्रसूती रजेची तरतूद आहे.
प्रसूती रजे अंतर्गत महिला कर्मचाऱ्याला तिच्या गर्भधारणेसाठी, बाळाचा जन्म आणि त्याच्या प्राथमिक काळजीसाठी रजा दिली जाते. या रजेसाठी कंपनी महिलांना पैसेही देते. म्हणजेच या रजेमध्ये महिलांना त्यांचा पूर्ण पगार दिला जातो.
यातच आता महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने एक मोठा उपक्रम सुरू केला आहे. खासगी क्षेत्रातील या कंपनीने महिला कर्मचाऱ्यांसाठी नवीन प्रसूती धोरण आणले आहे. हे पाच वर्षांचे धोरण सादर करण्यात आले आहे.
महिंद्रा अँड महिंद्राशी संबंधित सर्व महिला कामगारांसाठी हे धोरण असणार आहे. कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांनाही प्रसूती धोरणांतर्गत समाविष्ट केले जाईल. दत्तक आणि सरोगसी महिलांनाही या पॉलिसी अंतर्गत कव्हर केले जाईल आणि त्यांना प्रसूती रजा देखील दिली जाईल.
पाच वर्षांच्या या धोरणात काय आहे?
नवीन मॅटर्निटी बेनिफिट पॉलिसीमध्ये मॅनेजरच्या मान्यतेने 6 महिने लवचिक कामाचा पर्याय आणि 24 महिन्यांच्या हायब्रीड कामाचा पर्याय उपलब्ध आहे. यासोबतच एका आठवड्याची सक्तीची प्रसूती रजाही दिली जाणार आहे.
आशा खर्गा, मुख्य ब्रँड ऑफिसर म्हणाल्या की, एक उद्योग म्हणून आम्ही अधिकाधिक महिलांचा विचार करत आहोत आणि आमचे नवीन धोरण हा यातील महत्त्वाचा भाग आहे. या धोरणाचा उद्देश या पाच वर्षांमध्ये महिलांना पूर्ण पाठिंबा देणे हा आहे.
मुलाच्या देखभालीसाठी रजा घेऊ इच्छिणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कंपनी एका वर्षाच्या कालावधीसाठी पगाराशिवाय रजेचा पर्याय देईल. परंतु हे त्यांच्यासाठी आहे ज्यांनी संस्थेत 36 महिने सेवा पूर्ण केली आहे. कंपनी प्रसूती रजेवरून पुन्हा कामावर येणाऱ्या महिलांसाठी करिअर अॅश्युरन्स पॉलिसी देखील देत आहे.