Micro, Small and Medium Enterprises : ‘एम-वन एक्स्चेंज’शी राज्य सरकारचा करार

सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे, याचाच एक भाग म्हणून सरकारने ‘एम-वन एक्स्चेंज’ या इनव्हॉइस डिस्काउंटिंग सुविधा देणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी एक सामंजस्य करार केला आहे.
Micro, Small and Medium Enterprises
Micro, Small and Medium Enterprises sakal

मुंबई : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांच्या (एमएसएमई) आर्थिक सक्षमीकरणासाठी राज्य सरकार विविध उपक्रम राबवत आहे, याचाच एक भाग म्हणून सरकारने ‘एम-वन एक्स्चेंज’ या इनव्हॉइस डिस्काउंटिंग सुविधा देणाऱ्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मशी एक सामंजस्य करार केला आहे.

एम-वन एक्स्चेंज कंपनी ट्रेड रिसिव्हेबल डिस्काउंटिंग सिस्टीम (टीआरडीईएस) सेवा देणारा ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, ती एमएसएमईंना इनव्हॉइसेसच्या बदल्यात २४ तासांमध्ये खेळते भांडवल मिळवून देते. यामुळे व्यवसायवाढीत अडथळा ठरणाऱ्या खेळत्या भांडवलाच्या टंचाईवर छोट्या उद्योगांना सहज मात करता येते. हे भांडवल तारणमुक्त असते व त्याचे ‘एमएसएमईं’वर कोणतेही दायित्व नसते. सरकार आणि एम-वन यांच्यातील करारानुसार, राज्यातील विविध औद्योगिक क्षेत्रांमध्ये व्यापक जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येणार असून, या मंचावर नावनोंदणी करण्यासाठी ‘एमएसएमईं’ना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

Micro, Small and Medium Enterprises
Adani Enterprises FPO : अदानी इंटरप्राईजेसचा वीसहजार कोटींचा एफपीओ

या कराराबाबत उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘एम-वन एक्स्चेंजबरोबर केलेल्या भागीदारीचा राज्य सरकारला आनंद आहे आणि या सहयोगामुळे राज्यातील‘एमएसएमईं’ना आवश्यक तो मदतीचा हात आणि मार्गदर्शन मिळू शकेल. ‘एमएसएमईं’ना आपल्या कार्यकक्षा विस्तारता याव्यात यासाठी आवश्यक ती मदत पुरविण्यासाठी राज्याने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील हे एक पुढचे पाऊल आहे.’’

एम-वन एक्स्चेंजचे प्रवर्तक संदीप मोहिंद्रु म्हणाले, ‘‘ राज्याच्या एकूणच भरभराटीमध्ये योगदान देण्यासाठी ‘एमएसएमईं’ना झटपट, वाजवी दरात आणि योग्य वेळी खेळते भांडवल मिळवून देत त्यांना सक्षम बनविणे हे आमचे लक्ष्य आहे. राज्यसरकारबरोबर आम्ही केलेल्या सहयोगामुळे ‘एमएसएमईं’च्या आर्थिक वाढीला चालना देण्यात आमचेही योगदान असेल.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com