
मायक्रोसॉफ्टने 1.7 अब्ज डॉलरमध्ये 49 लाख मेट्रिक टन मानवी विष्ठा आणि सेंद्रिय कचरा खरेदीचा करार केला.
हा कचरा 5,000 फूट खोल जमिनीत साठवून कार्बन उत्सर्जन 23-30% कमी करण्याचा उद्देश आहे.
कंपनीला प्रत्येक टनासाठी कार्बन क्रेडिट्स मिळून सस्टेनेबिलिटी गोल्स साध्य करायचे आहे.
Microsoft: जगातील दिग्गज टेक कंपनी मायक्रोसॉफ्टने 1,46,93,04,50,050 रुपयांची (सुमारे 1.7 अब्ज डॉलर) भलीमोठी डील केली आहे. सॉफ्टवेअर विकणारी ही टेक कंपनी 49 लाख मेट्रिक टन मानवी विष्ठा खरेदी करणार आहे. फक्त मानवी विष्ठाच नाही, तर उपचार केलेला सीवेज, शेतीतील कचरा आणि सेंद्रिय खतही या करारात आहे. सर्वांचा प्रश्न एकच प्रश्न पडला आहे तो म्हणजे मायक्रोसॉफ्ट मानवी मल खरेदी करून काय करणार?