Budget 2024: शेतकऱ्यांसाठी सरकार करणार मोठी घोषणा; पीएम किसान योजनेचे पैसे वाढवण्याची शक्यता

Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे.
Modi Government big announcement in budget 2024 pm kisan yojana
Modi Government big announcement in budget 2024 pm kisan yojana Sakal

Budget 2024: यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार अनेक महत्त्वाचे निर्णय घेऊ शकते. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यावरही सरकारचा भर आहे. सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला देण्यात येणारी रक्कम वाढविण्याचा विचार करत आहे.

लवकरच प्रत्येक शेतकऱ्याला 6,000 रुपयांऐवजी 8,000 रुपये वार्षिक मिळू शकतात. म्हणजे 2000 रुपये वाढू शकतात. असे वृत्त इंग्रजी वेबसाईटने दिले आहे.

सरकार अंतरिम अर्थसंकल्प 2024 मध्ये गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलांना अतिरिक्त मदत देण्याचा विचार करत आहे. माहितीनुसार, सरकारी विभाग एमएसएमईसाठी आर्थिक सहाय्य वाढवण्याच्या उद्देशाने योजना तयार करत आहेत. असे वृत्त CNBC-TV18ने दिले आहे.

Modi Government big announcement in budget 2024 pm kisan yojana
श्रीमंतांच्या यादीत पुन्हा एकदा अंबानींनी अदानींना टाकले मागे, संपत्तीत 'इतक्या' कोटींची वाढ

पीएम किसान सन्मान निधी योजनेचा 15वा हप्ता केंद्र सरकारने गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर रोजी जारी केला होता. सरकारने आतापर्यंत 11 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 15 हप्त्यांमध्ये 2.81 लाख कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत. आता शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या पुढील म्हणजेच 16 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.

पीएम किसान योजनेशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास, शेतकरी pmkisan-ict@gov.in या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकतात. तुम्ही पीएम किसान योजनेच्या हेल्पलाइन नंबर - 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधू शकता.

Modi Government big announcement in budget 2024 pm kisan yojana
Ola Electric: ओला इलेक्ट्रिक देणार 25,000 लोकांना नोकऱ्या; 2,000 एकरवर मेगा फॅक्टरी उभारणार

पीएम किसान योजना विशेषतः गरीब शेतकऱ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत मिळालेल्या रकमेचा उपयोग शेतकरी शेतीसह त्यांचा आवश्यक खर्च भागवण्यासाठी करू शकतात.

या योजनेचा लाभ संपूर्ण शेतकरी कुटुंबाला मिळू शकतो. सरकारी नोकरी करणारी व्यक्ती, EPFO ​​सदस्य, 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन घेणारी व्यक्ती, खासदार, आमदार इत्यादींना या योजनेचा लाभ घेता येत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com